ऐतीहासिक-अद्भुत-अद्वितीय पेन्शन शंखनाद आंदोलन - रामलीला मैदान दिल्ली - अब की बार पेन्शन सरकार

ऐतीहासिक
-अद्भुत-अद्वितीय पेन्शन शंखनाद आंदोलन - रामलीला मैदान दिल्ली - अब की बार पेन्शन सरकार

 

एल्गार. एल्गार  ऐतीहासिक, अद्भुत, अद्वितीय पेन्शन शंखनाद आंदोलन - रामलीला मैदान दिल्ली - अब की बार पेन्शन सरकार..

01-ऑक्टोबर-2023 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे राष्ट्रीय पेन्शन संघटनेच्या (NOMPS) वतीने आयोजित पेन्शन शंखनाद आंदोलनात देशभरातून लाखो पेन्शन फायटर सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यातील हजारो पेन्शन फायटर तर वर्धा जिल्ह्यातील विविध विभागातील शेकडो पेन्शन फायटर उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. श्री. वितेशजी खांडेकर तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पुरस्कृत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे तडफदार शिक्षक आमदार  मा.श्री . सुधाकरजी अडबाले मंचावर उपस्थित होते. संपूर्ण राज्यभरातून लाखो पेन्शन फायटर रामलीला मैदानात उतरले होते.

यावेळी लाखो पेन्शन फायटर यांनी शपथ घेवून सरकारला  2024 चा अल्टिमेट दिला. सदर आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा वर्धा चे सर्व जिल्हा, तालुका व शहर पदाधिकरी तसेच विविध विभागातील शेकडो पेन्शन फायटर सहभागी झाले होते.

जो पेन्शन बहाल करेगा वही देश पे राज करेगा - पेन्शनच्या पुढील आंदोलनासाठी वर्धा टीम सज्ज - एकच मिशन जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे.

आझाद भारत news 24. से हमारे ब्युरो चीफ  धर्मपाल मानकर  महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post